Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

कन्या जैशा मुक्ता मीरा (Kanya Jaisha Mukta Meera)

By म. रा. कुलकर्णी (M R Kulkarni)


GENRE

Spiritual

PAGES

208

ISBN

9789387269736

PUBLISHER

StoryMirror

PAPERBACK ₹250
Rs. 250
ADD TO CART





पुस्तक बद्दल:


स्त्री-पुरुष विषमता सर्व पुरुष सत्ताक समाजात पूर्वापार चालत आली आहे; ती भारतात अधिकच प्रकर्षीने जाणवते. हिंदू धर्मात आदि काळापासून वेद पठणाचा व गायत्री मंत्र उच्चIरण्याचा अधिकार स्त्रियांना नाकारला गेला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा समता व समन्वय हा मूळ मंत्र. पण वारकरी चळवळही स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक विषमतेच्या प्रश्नाला हिरीरीने भिडलीच नाही. माता, पिता, कन्या, अशा विविध भूमिकेत स्त्री पुरुषाच्या जीवनात वावरली. पण नायिका (protagonist) म्हणून क्वचितच ठसा उमटवून गेली. तरी सर्व धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व लैंगिक अवरोधावर मात करत मुक्ता, ललद, मीरा, जना, बहिणा, आंडळ व अक्क महादेवी या संत स्त्रिया आपल्या व्यक्तिमत्तवाचा व विचारांचा संपन्न वारसा ठेवून गेल्या. संन्यासाची संतती म्हणून समाजाने वाळीत टाकल्यामुळे ज्ञानेश्वर भावंडाना उपनयनादी संस्कारांचा अधिकार नाकारला गेला. मुक्ताबाईच्या दृष्टीने हे एक इष्टIपत्तीच होती. तत्कालीन बालविवाहाच्या जाचातून ती सुटली. पुढच्या प्रपंचाचा खोडाही राहिला नाही. उलट तीन वर्षाच्या बहिणाला तीस वर्षाच्या बिजवाराशी - तोही शाक्त पंथाचा गाठ घालून देण्यात आली. सामाजिक अन्याया बरोबर तिला दीर्घ कौटुंबिक संघर्षही करावा लागला. मीराबाईच्या परंपरानिष्ठ राजपूत समाजात सासर-माहेर-समाज अशी सर्व पातळीवर विरोध सहन करावा लागला पण तिच्या आत्यंतिक मनस्विते मुळे तिने सर्व बंधने झुगारून येईल त्या प्रसंगाला निष्ठुरतेने तोंड दिले. काश्मीरची संत ललद व अक्क महादेवी यांचा जीवन यात्रा काही वेगळी नव्हती. आंडलने तर विवाह संस्थाच नाकारली व अध्यात्माच्या मार्गावर अढळ राहिल्या. मात्र ह्या सर्व निष्ठावंत साधकाच्या एक जगावेगळे साम्य होते. ते म्हणजे त्या सर्वांचा अंत हे एक कायमचे गूढ राहिले. त्या सर्व ब्रह्ममय झाल्या हे खरे. पण लौकिक पातळीवर त्यांचे निर्वाण एक प्रश्न चिन्ह मागे ठेवून गेले. 

 

लेखक बद्दल:

 

लेखक पुणे विद्यापीठात B.A.(Hons) Economics, प्रथम वर्गात प्रथम आले (१९५०). तेथेच त्यांनी अर्थशास्त्रात M.A. केले. त्यानंतर डेक्कन एडुकेशन सोसायटीच्या बॉम्बे कॉलेज (कीर्ती कॉलेज), मुंबई व विलिंग्डन कॉलेज, सांगली येथे पाच वर्षे अर्थशास्त्राचे अध्यापन केले. १९५८ मध्ये त्यांची नियोजन आयोग  मध्ये Research Officer  म्हणून निवड झाली. पुढे Indian Economic Service (IES) ची स्थापना झाल्यावर त्यात समावेश झाला. तेथून १९८५ मध्ये आर्थिक सल्लागार या पदावरून निवृत्त झाले. १९६४-६५ साली त्यांची India - Yugoslavia Exchange Programme अंतर्गत Belgrade (Yugoslavia) येथे Investment Planning in Yugoslavia या विषयाचा अभ्यास करण्यासाठी निवड झाली. १९७६ मध्ये कोलंबो प्लॅनच्या अंतर्गत त्यांना Cambridge University व London School of Economics (LSE) मध्ये Economic Forecasting चा अभ्यास करण्याची संधी मिळाली. १९८२ मध्ये India - Germany Planning Group चे सदस्य या नात्याने बर्लिन येथे झालेल्या पहिल्या बैठकीत त्याने भाग घेतला. Indian Economic Journal, Economic & Political Weekly, योजना, इ. यातून त्यांनी लेखन केले. त्यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत: Industrial Development, National Book Trust, Five editions since 1971

मराठी- ज्ञानेश्वरीतील अर्थविचार (स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे) ; ज्ञानेश्वरीतील स्त्री प्रतिमा (आनंद लाटकर प्रकाशन, पुणे); संत नामदेव (शब्द वैभव प्रकाशन, पुणे)











You may also like

Ratings & Reviews

Be the first to add a review!
Select rating
 Added to cart