We will fetch book names as per the search key...
स्टोरीमिररने शालेय लेखन स्पर्धा या संकल्पनेवर आधारित 'स्टोरी मिरर शालेय लेखन स्पर्धा 2019'चे आयोजन केले होते आणि ही स्पर्धा सर्व शाळांपर्यंत पोहोचली तथा शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला व या स्पर्धेमुळे त्यांना आपल्या कथा, कविता आदी रचना जगासमोर सामायिक करता आल्या, त्यांचाही आवाज जगाने ऐकला.
सदर स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाकांक्षी लेखकांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. आमच्याकडे सदर स्पर्धेद्वारे अनेक उत्कृष्ट रचना सादर केल्या गेल्या आणि त्या तुम्हीही वाचाव्यात असे आम्हाला वाटते.
सदर पुस्तकात शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट रचनांचा समावेश असून आम्हाला आशा वाटते की, आपल्यालाही त्या वाचून वाचनाचा उत्तम अनुभव मिळेल.