We will fetch book names as per the search key...
About the Book:
कविता ही लिहावी लागत नाही. ती अनुभव सिद्धीतून नकळत उमटते. कविचा हात फक्त माध्यम असते आणि एखादा चार पाने लेख लिहीणं जमेल. पण ४ अंत-याची कविता लिहीणं हे सोपं काम नाही. त्यात गीत लेखन ही तर प्रत्येक वेळी कविची कसोटीच असते.शब्दांच चपलखपणा आणि लवचिकतेने शब्दांची व्यूहरचना करणं दर्दी कविलाच जमतं. अभंग, लावणी, प्रेमगीत, अंगाई गीत, ह्यातील भावना गीतातून सुयोग्य रितीने मांडण्यात तोच कवि यशस्वी होतो. ही एक कला आहे. थट्टांचा विषय नाही.
काळजाला हात घालणारे शब्द वापरण्यात कवि राजेंद्र वैद्य – कल्याणकर हे नक्कीच यशस्वी झाले आहेत. कविता लिहीणं ही नैसर्गिक व अभिजात देणगी आहे. ती कोण्या देवाला नवस करून अथवा दुस-याचे शब्द चोरून लिहिण्याने सिद्ध होत नाही. इथे ह्या संग्रहातसुद्धा कविने अनेक विषय लिलया आणि सोप्या भाषेत शब्द बद्ध केले आहेत. ह्यामागे त्यांची ४५ वर्षांची शब्द तपस्या आहे हे प्रत्येक कविता वाचताना जाणवते. केवळ मनाला गुदगुल्या करणारी प्रेमगीते तर आहेतच पण अन्य दैनंदिन घडामोडीवर काव्य रूपाने केलेले त्यांचे भाष्य, सहज मनाला भावते.
नवी उमेद, नवा विचार, नवी उत्तरे सांगून जाते. आज माध्यमे आणि कवितांचा सुकाळ झालाय. पण दूर रानात स्वमग्न असलेल्या वनलतिकेप्रमाणे कवि सर्व मोहातून दूर राहिलाय.अनेक नामवंत कविंचे आशिर्वाद घेऊन तो सतत नव चैतन्याने कविता लिहीतोय. तीच त्याची आंतरिक उर्मी वाचकाला मोहात पाडते आणि वाचकालाही ‘शब्द माझे सोबती’ आहेत अशी ऊर्जा प्राप्त होते. आम्ही हा कवि शोधून काढला तो तुम्हा काव्य प्रेमीसाठी. दाद द्या. मोजदाद करा. हा घ्या ' शब्द माझे सोबती '. एकटयाने जीवनवाट चालतानाचा मित्र.
About the Author:
कवी आठवणीतील कविता, काव्य तरंग,शिरिज फुले यांचे मार्फत यु टयुब साठी कविता वाचन केले. प्रा.प्रदिप ढवळ यांच्या “शिवबा” नाटकाचे गीत लेखन केले. ११० प्रयोग संपन्न केले. बावीस प्रातिनिधीक कविता संग्रहातून कविता समाविष्ट केल्या. कल्पतरूची उंची हा कविता संग्रह हि प्रकाशित केले.काव्य किरण मंडळ, कल्याण,शब्द सुमने मंडळ यांच्या राज्यस्तरीय काव्य संग्रह स्पर्धेत, परीक्षक होते. कविचे लेखनातून प्रसार भारती (आकाशवाणी) ने अकरा गीते दैनिक प्रसारणासाठी बावीस केंद्रावर ऐकवण्यासाठी घेतलेली आहेत.सन १९८७ व २०१९ या सालात राज्य पुरस्कार प्राप्त. नऊ कथा संग्रह प्रकाशित केले. कथावली भाग १,२,३ ह्या मेनका प्रकाशन, पुणे ह्यांच्याकडील प्रातिनिधीक संग्रहात कथा आहेत.पाच नविन कथा संग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.