We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹75 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
पुस्तकाबद्दल
स्त्री-एक स्वतंत्र व्यक्तिमत्व.
ह्या पुस्तकात ५ हि लघुकथा ह्या स्त्रीच्या बाबतीतल्याच आहेत, पण त्या कथा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर, ह्या पुस्तकात प्रेरणादायी,जादुई,भयपट,अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथांचा समावेश केलेला आहे,एका स्त्रीला तिच्या जीवनात किती वेगवेगळ्या प्रसांगाना सामोरे जावे लागते, आणि ती न डगमगता त्या प्रसंगांना कशी सामोरी जाते ह्याचे वर्णन ह्या पुस्तकात केले आहे. मला तर खूप मज्जा आली हे पुस्तक लिहिताना, मी आशा करते कि वाचक म्हणून तुम्हाला हि ह्या कथा नक्की आवडतील.
लेखिकेबद्दल
नमस्कार,मी ऋतुजा पवार,मी मूळची धुळे जिल्ह्याची.
माझे शिक्षण एमसीए झाले आहे. मी व्यवसायाने नोकरी करते.मला आधीपासूनच लिखाणाची प्रचंड आवड आहे.तसेच मला वाचनाची देखील आवड आहे.मला जीवनात स्वतःला सतत व्यस्त ठेवणे खूप आवडते.काहीतरी करत असलो ना कि बुद्धीला चालना मिळत असते असे मला वाटते.
खरे तर कोरोना मुळे आपण सर्वजण लॉकडाउनमध्ये अडकलो.पण ते म्हणतात ना,कि वाईटात देखील चांगले दडपलेले असते फक्त वेळ असते ते शोधण्याची, तसंच काहीसं माझ्याबाबतीत देखील झाले.माझे लिखाण कौशल्य हे खरे लॉकडाऊन मध्येच फुलले.मी मनात येईल ते लिहत गेली आणि फक्त लिहत गेली, आणि ते लिखाण मी माझ्या पहिल्या पुस्तकीरुपात तुमच्या समोर मांडण्याचा एक निरागस प्रयत्न केला आहे.लेखिका म्हणून अजून मला पुढे खूप काही करायचं आहे शिकायचं आहे,त्याची सुरुवात मी ह्या पुस्तकापासून करते आहे.
तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू देत, माझ्या ह्या प्रयत्नात काही चूक भूल झाली असल्यास क्षमस्व !!
तुमचीच,
सौ.ऋतुजा पवार.