Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

पुढे चला : कवितासंग्रह (मराठी) | Pudhe Chala (Marathi)

★★★★★
Read the E-book in StoryMirror App. Click here to download : Android / iOS
Author | Pradip Shahane Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | Ebook Pages | 140

1ratings

5 average based on 1 review.

5 star
1
4 star
0
3 star
0
2 star
0
1 star
0
E-BOOK
₹129
PAPERBACK
₹249About the Book:


ही गाडी जीवा जोडी हो..

गोडी जगवे देहदडी हो..

सांगतो तुम्हा ऐका हो..

थांबला तो संपला..

पुढे चला हो.. पुढे चला...


हा अमृत रूपी कवितासंग्रह “पुढे चला” तुम्हाला खूप काही शिकवेल. यातील प्रत्येक काव्य, जनमानसांच्या मनातील विचार पुढे घेऊन जाणारा एक पदपथ होईल. असा हा विश्वास तुमच्या प्रत्येक मनामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न “कवी” म्हणुन मी केला आहे. माझा साहित्य क्षेत्रातील प्रवास मराठी साहित्यातील महानुभव यांच्या सारखा पुढे जाईल अशी माझी इच्छा आहे. साहित्य हेच मानवाला सर्वगुण संपन्न बनवते. त्यामुळे ते सोप्या शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.


About the Author:


मराठी साहित्य क्षेत्रातील हा माझा आरंभ "पुढे चला" कवितासंग्रहच्या माध्यमातून होत आहे. हा कवितासंग्रह तुम्हाला जीवनात सर्वागीण पातळीवर आपली भूमिका एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच सर्व सामान्य माणसाच्या जीवनाला कलाटणी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न "पुढे चला" या कविता संग्रहातून यशस्वीपणे सार्थक होणार आहे.

माझा जन्म 1992 यावर्षी परभणी जिल्ह्यातील आहेर बोरगाव या छोट्याशा खेड्या गावात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षण नितीन माध्यमिक विद्यालय बोरगाव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण हे नूतन महाविद्यालय सेलू येथून विज्ञान शाखेत झाले. शिक्षण या पेशाकडे कल असल्यामुळे त्यांनी सि.पी. अध्यापक विद्यालय सेलू येथून डी.टी.एड प्राथमिक शिक्षक ही पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लहान मुलांची खाजगी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. त्यासोबत यशवंतराव मुक्त विद्यापीठ केंद्र सेलू येथून बी.ए ही पदवी प्राप्त केली. तसेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे आयोजित हिंदी परीक्षा "हिंदी पंडित" पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिका बेस्ट परिवहन उपक्रम येथे वाहक या पदावर 2013 पासून नोकरी सेवेत कार्यरत आहेत.Add your rating & review


Reviews (Beta)

 Added to cart