We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹299 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
नमस्कार मित्रांनो मी वैभव दातार. मी तुमच्या बरोबर पैसा कमविण्याच्या काही अतिशय महत्वाच्या बाबी मांडणार आहे.
आज एक सामान्य माणसाला पैशाचा तणाव आहे असे म्हटलं तर चुकीचं नाही, तो खुप असतो. प्रत्येक महिन्याला, महिना अखेरीस आणि नवीन महीना चालू झाला की मुलभूत गरजांसाठी ही कधीतरी पैसा कमी पडतो.
तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात खुप स्वप्न सजवली असतील आणि मला खात्री आहे की त्यातली 99% स्वप्नं पूर्ण करायला पैसा पाहिजे.
आणि तो पैसा कसा कमवायचा किंवा तो कसा आणायचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे.
मित्र हो, एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की आपण ज्या वातावरणात वाढलो त्याचा परिणाम आपल्या सवयी आपले विचार, यावर होतो.
पैश्याच्या बाबतीत पण असच काही आहे. आज जर तुम्हाला पैश्यांचा अभाव असेल किंवा पैसा कमवण्यात काही अडचणी असतील तर ते आपला पैश्याकडे बघण्याच्या द्रुष्टीकोणातुन आहे.
मी तुम्हाला ह्याच गोष्टींच एक रहस्य उलगडून सांगणार आहे. आणि त्या केल्या नंतर माला खात्री आहे की तुम्हाला पैश्यांची कमतरता भासणार नाही आणि पैसे कमविण्यात तुम्हाला नक्कीच मदत व चालना मिळेल.