We will fetch book names as per the search key...
About the Book:
“गावाकडील आठवणी” या कथासंग्रहातून लेखकांनी अनुभवलेले, पाहिलेले प्रसंग प्रत्यक्ष वाचकांसमोर ठेवले आहेत. तसेच बालकांच्या, समाजाच्या गरजा लक्षात घेऊन हा कथासंग्रह मी लिहिलेला आहे. हा कथासंग्रह ग्रामीण भागाशी निगडीत आहे. ग्रामीण भागाचे हुबेहूब चित्रण या कथा संग्रहातून दर्शविण्यात आले आहे. या कथेतील पात्र काल्पनिक आहे. त्यांचा वास्तवाशी संबंध जोडू नये, असल्यास योगायोग समजावा.हे पुस्तक वाचून तुम्हला देखील तुमच्या गावाकडील आठवणींना उजाळा मिळेल.
About the Author:
संजय रघुनाथ सोनवणे हे पेशाने शिक्षक असल्यामुळे लिखाणात त्यांना अधिक रुची आहे. ग्रामीण भागातील असल्यामुळे घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. म्हणून गाव सोडून त्यांनी शहरी भागाकडे वाटचाल केली. सुरवातीला त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातूनच त्यांनी आपले बी. ए डी. एड च शिक्षण पूर्ण केले. एवढ्या अडचणींचा सामना करताना त्यांच्या लेखणीनं त्यानं बळ दिल. लेखकांचे अनेक कथा व कविता वेगवेगळ्या मासिकात तसचे स्टोरीमिरर ह्या ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध आहेत.
संजय रघुनाथ सोनवणे हे एकमेव असे साहित्यिक आहे की त्यांनी अनुभवातून हुबेहुब ग्रामीण भागातील वास्तव चित्रण केले आहेत. प्रसिद्ध साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या सोबत लेखकाने त्यांच्या साहित्य प्रवासाला सुरवात केली व अनेक साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होऊ लागले. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर पुंजाजी पाटकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. लेखकाला शरदचंद्र पवार प्रतिष्ठानाच्या काव्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, केंद्रीय दलित अकादमी (दिल्ली) आणि मुंबई सरचिटणीसातील कामात त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे .