We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | ₹100 | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
संजय रघुनाथ सोनवणे हे
साहित्यिक असून त्यांचे अनेक कथासंग्रह,काव्यसंग्रह व लेखसंग्रह प्रकाशित झाले आहे.ते शैक्षणिक क्षेत्रातील नवनवे संशोधन करत असतात.शिक्षणक्षेत्रात ते उपक्रमशील शिक्षक म्हणून नावारुपाला येत आहे.त्यांचे साहित्य दर्जेदार असून ते विद्यार्थ्यांना समाजाला व शिक्षणसंस्थाना उपयोगी आहेत.अनेक कथा,कविता,गीते,पोवाडे,लेख लिहून सामाजिक कार्य करत आहेत.
संजय सोनवणे हे ग्रामीण भागातून पोटाच्या उपजीवीकेसाठी मुंबई आले.शिक्षण घेत असताना त्यांना अनेक गोष्टींशी संघर्ष करावा लागला.त्यातूनच साहित्य जीवनाचा जन्म झाला व विविध प्रकारचे साहित्य ते लिहू लागले.पुढे शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्या पैशातून त्यांनी पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली.त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व समाजाला केला.अनेक शाळांना भेटी देऊन पुस्तकांच्या प्रती भेट म्हणून वाचनालयास दिलेल्या आहेत.त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील जीवंत व वास्तव साहित्य होय.शहरी व ग्रामीण भागातील समस्या त्यांनी लेखनातून मांडल्या आहेत.
कथासंग्रहात जीवन परिवर्तन हा कथासंग्रह निश्चितच वास्तव लेखन वाचकांसमोर आपल्या कथेतून प्रेरणादायी ठरेल.
संघर्षमय जीवन जगलेले संजय सोनवणे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.