We will fetch book names as per the search key...
About the Book:
" माझा पहिला कथासंग्रह 'इंद्रधनुष्य'प्रकाशित झाला असून त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.वाचकांच्या या प्रोत्साहनामुळे प्रेरित होऊन हा दीर्घकथासंग्रह प्रकाशित करताना मला आनंद होत आहे.
दीर्घायन हा दीर्घकथांचा संग्रह असून यात वेगवेगळ्या विषयांवरील कथा आहेत.यात सामाजिक कथा आहेत तसेच रहस्यकथा, गूढ कथाही आहेत.
ओघवती भाषा, रंजक शैली आणि विषयांची विविधता यामुळे हे पुस्तक रंजक झाले आहे.
About the Author:
दीर्घायन या पुस्तकाच्या लेखिका -प्रतिभा ताराबादकर यांचे शिक्षण B.A. असून अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी काही काळ शाळेत नोकरी केली.
त्यांना वाचन आणि लेखनाचा छंद असून अनेक मासिके, दिवाळी अंकात त्यांच्या कथा, कविता, लेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यांच्या कथा, कविता, लेख यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात स्वलिखित कविता सादर करण्याचा मान लेखिकेला प्राप्त झाला आहे.त्या स्टोरी मिरर, प्रतिलिपी, अक्षरधन, माझ्यातली मी, मराठी साहित्य वाचन कट्टा,माझे पान इ.वर नियमित लेखन करतात. त्यांचा'इंद्रधनुष्य'हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.दुसरा दीर्घकथासंग्रह 'दीर्घायन' हे त्यांच्या विपुल लेखनाचे द्योतक आहे.