We will fetch book names as per the search key...
About the Book
जेष्ठ कवी शंकरराव इंगळे यांचा ‘तू योद्धा’ हा काव्यसंग्रह फुले-आंबेडकरी मुल्यांना कवेत घेऊन अवतरला आहे. साठोत्तरी व नव्वदोत्तरी दलित-आंबेडकरी कवितेचे संस्कार या संग्रहात दिसून येतात. गेल्या तिस-चाळीस वर्षात फुले-आंबेडकरी कवितेने जी वळणं घेतली आहेत त्याच्या खाणाखुणा या कवितेत दिसून येतील.
समता, स्वातंत्र्य, बंधुता ही भारतीय संविधानातील तत्वत्रयी आमच्या देशाच्या सेक्युलॅरीझमची कवचकुंडले आहेत, म्हणून ती अबाधित असायला हवी अस आग्रहाच प्रतिपादन ही कविता करते.
ही कविता, अन्याया विरूद्ध लढण्याची प्रेरणा देणारी आहे. विषमते विरूद्धच युद्ध अजूनही संपलेलं नाही, अजूनही अंधार पसरलेला आहे, अंगारवाट निखार्यांनी भरलेली आहे. म्हणूनच सजग राहून वाटचाल करावी लागेल.
हा संग्रह वाचून आपणांस ढसाळ, त्र्यंबक सपकाळे, डांगळे, चेंदवणकर, दया पवार यांच्या कवितेची आठवण येईलच !
About the Author
कवी शंकरराव इंगळे हे मुळचे विदर्भातील वडनेर या गावाचे. नोकरी निमित्त ते मुंबईत आले आणी तेथेच स्थायिक झाले .
इंगळे यांच महाविद्यालयीन शिक्षण डॅा. आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या प्रख्यात मिलिंद कॅालेज मधे झालं त्यामुळे आंबेडकरी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मिलिंदचं आंबेडकरी विचारांनी समृद्ध असलेलं वातावरण व प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक वामन निंबाळकर यांच मार्गदर्शन यामुळे ते सामाजीक चळवळीशी अंतर्बाह्य जोडल्या गेलेत. या परिसरातच त्यांना लिहायची-वाचायची गोडी लागली.
निमशासकीय सेवेतं असतांना त्यांनी बर्याच नियतकालीकातून लेखन केलं. अनेक दिवाळी अंक-पाक्षीकातून कविता सादर केल्यात.
इंगळे बौद्ध साहित्याचे अभ्यासक आहेत.
व्यक्तिगणिक एक योद्धा वसलेला असतो . त्याचं युद्ध अहोरात्र चाललेलं असत , परिस्थिती व समस्या सोबत.
तू योद्धा‘ हे त्या प्रत्येक लढवय्याच प्रतिक आहे.