We will fetch book names as per the search key...
About the Book:
महाभारतासारख्या जटील महाकाव्याने आजपर्यंत अनेक सर्जनशील मनांना आकर्षित केले आहे. माझ्याही संवेदनशील मनाला यातील काही पात्रांच्या जगण्यातील गुढता स्पर्शून गेली. मग त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधण्याचा शोध सुरु झाला. प्रथम मला कपाळावरली वाहणारी जखम घेऊन फिरणारा अश्वस्थामा इच्छांच्या मागे पळणाऱ्या माणसांत दिसला. हा शोध न संपणारा होता. महाकाव्यातील घटनांचे साधर्म्य समाजातील घटनांमध्ये शोधत राहिले. सभोवतालच्या लोकांमध्ये यातील पात्रांचे अस्तित्व शोधत राहिले. माझ्या मते महायुद्धात ह्या व्यक्तीरेखांचा अंत झाला नाही. त्यांचे अस्तित्व समाजातील विविध वृत्ती-प्रवृत्तींमध्ये अजूनही आहे. मी माझ्या कवितांमधून त्या व्यक्तीरेखा व त्यांच्या मनातील सल मांडण्याचा प्रयत्न
केला आहे.
प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट स्वभाव असतो. स्वभावानूसार त्याचे वर्तन घडत असते. हाच स्वभाव त्याचे समाजातील स्थान निश्चित करत असतो. पण जर प्रत्येकाचा स्वभाव आपली मर्यादा सोडून व्यक्त होऊ लागला तर संघर्ष निर्माण होतो. महायुद्ध हे अशाच संघर्षाचे एक भीषण रुप आहे. समाजातील विविध घटना, प्रवृत्ती यांचे मर्यादेबाहेर व्यक्त होणेच महायुद्धाला जन्म देत असते. अशी महायुद्ध झाली व होतच राहतील. अशा युद्धातून समाजाला नवा विचार देणारा कृष्ण पुढील पिढीला प्रेरणादायी ठरत असतो.
About the Author:
प्रणाली प्रकाश सावंत यांचा जन्म व बालपण मुंबईतील गिरणगावात गेले. त्यामुळे जगण्यासाठीची धडपड त्यांनी पाहिली व अनुभवली आहे. शिक्षिका होणे हे त्यांचे स्वप्न होते म्हणून बारावी नंतर डी. एड केले. शिक्षिका म्हणून कामही केले. पण काही कारणास्तव नोकरी करणे त्यांना शक्य झाले नाही. मनात शिक्षिका सतत राहिली. शिक्षण घेण्याच्या तीव्र इच्छेतून त्यांनी इतिहास व मराठी साहित्य याविषयांत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. संस्कृतमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा केला. लेखणाच्या आवडीमुळे त्या काहींना काही लिहित राहिल्या, पण ते वहीत कायमच बंद राहिले. ते व्यक्त होण्यास निश्चित दिशा गवसत नव्हती. आपला हा कवितासंग्रह वाचकांसमोर सादर करुन त्या आपला लेखनप्रवास सुरु करत आहेत.