We will fetch book names as per the search key...
| Seller | Price | |
|---|---|---|
| StoryMirror Best price | ₹550 | |
| Amazon | Price not available | |
| Flipkart | Price not available |
बुक ऑफ लव्ह (Book Of Love - Marathi)
हा अभूतपूर्व कथासंग्रह स्टेरीमिररवर सादर केलेल्या हजारो कथांतून साकार झाला आहे. प्रत्येक कथा प्रेमाच्या सौंदर्याने ओतप्रोत आणि सामान्य जीवनापलीकडे विचाराला प्रवृत्त करणारी आहे. या कथा मनमोहक, मनोरंजक आणि चित्ताकर्षक लेखनाचा परिणाम आहेत! कोणीतरी अगदी बरोबरच म्हटलेय की - प्रेम एक शानदार भावना आहे, अथवा ती आपल्या सर्वांची गरज आहे!
अज्ञात (Adnyat)
‘बालपणी पावसात भिजताना बेभान व्हायचो आणि जाणवलं,बालपणानंतर आपण पावसापासून स्वतःचा बचावच करत आलो’ अज्ञात कथेतील मृत्यूसमीप झालेली ही जाणीव; ‘घायाळ करणाऱ्या घटनांना फक्त आंतरिक स्थिरतेची जोड दिली की त्या जखमा विरून जातात हे तुला कळू लागले होते, पण तीच एक एक जखम आपल्या हातून अलौकिक कला घडवतेय, म्हणून तू त्या जखमेचेच शब्द केलेस.
प्र - प्रेरणेचा (Pra-Preranecha)
तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोंधळल्यासारखे वाटते? सर्वत्र अव्यवस्थितपणा दाटलेला असताना तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी नवीन आणि आनंदाची आवश्यकता आहे? चला, तर मग, तयार व्हा, आता तुमच्या आयुष्यातील गोंधळ, अव्यवस्थितपणाला मागे सारुन पुढे जाण्याची वेळ आली आहे.
आजारांचं फॅशन (Aajaranch Fashion)
अनिलला आजाराला आणि मृत्यूला घाबरण्याची एक विलक्षण भीती, किंबहुना एक मनोरोग, ह्या भीती आणि मित्रां मुळे दारू पिण्याची सवय, ह्या गोष्टींनां कंटाळुन त्याची पत्नी मुलंबाळं घेऊन त्याला सोडून जाते. आजार विद्रुप रूप घेतो आणि मग मनोरोगतज्ज्ञांच्या मदतीने तो कसा सावरतो, आपल्यातल्या सुप्त गुणांना कसा वाव देतो आणि कसं कुटुंब पुन्हा एकत्र होतं त्याची आणि मोनोविज्ञाना आणि आजाराचा भ्रम या रोगा बद्दल माहिती देणारी एक अविस्मरणीय आणि चित्त थरारक कथा.