We will fetch book names as per the search key...
About the Author -
मी ईश्वर त्रिंबक आगम मूळचा पुणे जिल्ह्यातील आणि बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर या गावचा. सध्या आयटी कंपनीमध्ये नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. आई आणि आजीपासून लागलेली ही वाचनाची आवड मला नकळत लेखनाकडे घेऊन आली. गड-किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देता-देता इतिहास वाचन आणि लेखनाची आवड निर्माण झाली. प्रतिलिपी, स्टोरीमिरर, मातृभारती या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लेखनाची सुरुवात झाली. वाचकांची
पसंती मिळू लागली, पारितोषिके मिळू लागली. स्टोरीमिरर आयोजित पहिल्या ललितबंध कथासंग्रहामध्ये माझी कथा पहिल्या क्रमांकावर प्रकाशित. नुकतेच माझे पहिले पुस्तक “शर्यत” (कादंबरी) जानेवारी २०२४ मध्ये पुस्तकविश्वच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेले आहे. आपल्या हातून अधिकाधिक चांगलं लेखन व्हावं आणि वाचकांच्या हाती एक चांगला ऐवज पडावा अश्या अपेक्षेने लेखनाची वाटचाल चालू आहे.
About the book -
त्याने थरथरतच ती संदुक उघडली. गोकुळातून निघताना कदंब वृक्षाखाली राधेला शेवटचं भेटलो, तेव्हा तिच्याकडे दिलेली बासरी! तिने अजूनही जपून ठेवली होती. त्याबरोबर होतं एक सुंदर मोरपंख! तिने ते हळूच उचलून घेतलं. त्याच्या डोक्यावरच्या सोनेरी वलयांकित मुगुटात खोचलं.
कान्हा... तुझी बासरी ऐकतंच आता, शेवटचा श्वास घ्यावा असं वाटतेय रे...!"
त्याच्या खांद्यावर तिने अलगद मान टेकवली. त्याने बासरीतून मधुर ताण छेडायला सुरुवात केली. तीतून निघणारे मधुर मंजुळ स्वर ऐकून राधा पुन्हा एकदा भान हरपून ऐकू लागली. एक प्रहर, दोन, तीन प्रहर उलटून गेले. कृष्ण बासरी मधून संगीताचे सूर छेडतच होता. राधाही तल्लीन होऊन ऐकत होती.
- मोरपीस