We will fetch book names as per the search key...
5 average based on 2 reviews.
About the book - आपल्या आत व बाहेर प्रत्यक्ष काय घडत आहे, याचे आकलन करुनच मी या कथा लिहिल्या आहेत. या कथा वाचताना तुम्हाला स्वत:चे नेमके आकलन होईल ज्याने तुम्ही सार्थ जीवनाकडे वळाल अशी मला खात्री वाटते. मुख्य म्हणजे जीवनाचे सौंदर्य आणि संपूर्णत्त्व तुमच्या आकलनात येईल. जीवनाचे संकुलत्व, त्याची गुंतागुंत व क्षणाक्षणाला होत राहणाऱ्या त्यातील प्रतिक्रिया, यांचे संपूर्ण आकलन जोवर तुम्हाला होणार नाही, तोवर या जगण्याला अर्थ येणार नाही. माझ्या कथेतील पात्र काल्पनिक असली तरी त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे आकलन करून तुम्ही तुमचं जीवन योग्य घडवू शकाल अशी मी आशा व्यक्त करते.
About the author - माझं नाव माधुरी शर्मा आहे. माझं वय वर्ष २७ आहे. सध्या मी एक गृहिणी आणि एक उत्तम आई आहे. लग्नापूर्वी मी लिखाणाला सुरुवात केली होती. मी m.com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मी m.com ला टाॅप केलं होतं. मी एक उत्तम वादविवाद पटू होते आणि मी महाविद्यालयीन अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व तसेच वादविवाद स्पर्धा जिंकलेल्या आहेत.