We will fetch book names as per the search key...
About the Author - लेखकाला लहानपणापासून रहस्यकथांची आवड आहे. नारायण धारप, सुहास शिरवळकर आदींच्या लेखनाने सातत्याने प्रेरणा मिळालेल्या लेखकाने मानवी मूल्यांसोबतच गूढता, पुनर्जन्म, भीतीचं सावट, अनपेक्षित घटना समाविष्ट असलेल्या आणि सत्याचा शोध घेणाऱ्या कथा या कथासंग्रहात घेतल्या आहेत. लेखकाला आजपर्यंत विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मराठी आणि हिंदी लेखनासाठी विजेतेपद मिळाले आहे. संशोधक विद्यार्थी असणाऱ्या लेखकाने विविध आॅनलाईन माध्यमांवर "व्यासंगी आरसा" या नावाने लेखन केले आहे. लेखकाने कथा-कथामालिका, कविता, नाटक-एकांकिका, अभंग, शायरी, लेख, निबंध, गझल अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.
आपल्या कल्पना आणि संकल्पना उत्तमोत्तम रीतीने वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी लेखक सातत्याने प्रयत्नशील आहे. या कथासंग्रहाच्या माध्यमातून वेगळे विषय स्वतःच्या अनोख्या शैलीत वाचकांपर्यंत पोचवण्याचा आणि मनोरंजनातून संदेश देण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.