We will fetch book names as per the search key...
युवा मराठी(२०१९-२०) हा एक वार्षिक अंक असून यात, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT Vellore) या प्रसिद्ध अभियांत्रिकी विद्यापीठात वसलेल्या युवा मराठी परिवाराचे व विद्यापीठांतर्गत होणारे विविध कार्यक्रम जे महाराष्ट्राची ज्योत महाराष्ट्राबाहेरही प्रज्वलित करण्याचे कार्य करतात,या बद्दल सविस्तर माहिती आहे.या सोबतच आमच्या सभासदांनी लिहिलेले विविध लेख,कथा,कविता आणि बरंच काही या वार्षिकात समाविष्ट आहेत.आम्हाला आशा आहे की ते तुम्हाला नक्कीच आवडतील!
'युवा मराठी' ही VIT Vellore या विद्यापीठातील अधिकृत मराठी साहित्य मंडळ असून मराठी साहित्याचा व संस्कृतीचा महाराष्ट्राबाहेर विस्तार व्हावा हा आमचा मूळ हेतू व प्रेरणा.आमचे सभासद हे मराठी साहित्याचे रसिक असण्याबरोबरच उत्तम लेखक व कवी/कवियत्री सुद्धा आहेत.या वार्षिकात विविध लेखक व कवींचे लिखाण सादर केले आहे.