We will fetch book names as per the search key...
About the Book:
'त्रिकोणीय सामना' या कथासंग्रहात २५ विनोदी, सामाजिक कथांचा समावेश आहे. या कथांमध्ये निवडणुका, प्रेमदिवस, मी टू चळवळ, महिला, राजकारण, अंत्यसंस्कार, कर्ज, पुरस्कार, भविष्य, लग्न, मैत्र, बँक, शैक्षणिक, पती-पत्नी, मृत्यू, संक्रांत, डास, भ्रमणध्वनी, साहित्य, स्वयंपाक अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
About the Author:
मी नागेश सू. शेवाळकर, पुणे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी मला महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. मी गेली तीसपेक्षा अधिक वर्षे साहित्य लेखन करीत आहे. कादंबरी, कथासंग्रह, चरित्र इत्यादी विविध साहित्य प्रकारातील तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ऑनलाईन साहित्य क्षेत्रातही माझे अनेक साहित्य संस्थांवर कादंबरी, कथासंग्रह, पत्रं, चरित्रं अशी विविधांगी जवळपास चाळीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ऑनलाईन विभागात माझ्या साहित्याची वाचक संख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे.
'स्टोरीमिरर' संस्थेच्यावतीने 'ऑथर ऑफ द ईयर २०१९' नामांकन, तसेच 'ऑथर ऑफ द विक', 'LITARARY CONOL, 'LITARARY BRIGEDIER' हे बहुमान प्राप्त झाले आहेत. स्टोरीमिररने आयोजित केलेल्या प्र-प्रेरणेचा या कथास्पर्धेतही माझी कथा बक्षीसपात्र ठरली. नुकतीच लेखन आव्हान स्पर्धेचा विजेता म्हणून माझी निवड झाली. या कथांचे पुस्तक स्टोरीमिरर संस्था प्रकाशित करीत आहे.