We will fetch book names as per the search key...
प्रिय सर्जनशील मनांनो,
आपल्याला माहितीच आहे की लेखकाचा प्रवास एकट्यानेच केला जातो. उर्वरित प्रत्येकजण स्वतःचे मनोरंजन करण्यात किंवा अगदी झोप घेण्यात व्यस्त असतो, तेव्हाही लेखक काहीतरी वाचण्यात किंवा उत्कृष्ट कथा वा कविता लिहिण्यात गढून गेलेला असतो, जेणेकरुन ज्ञान एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत आणि एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत पोहोचावे.
तथापि, सध्याच्या डिजिटल युगात, आपल्यातील कौशल्य दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने उत्तमोत्तम रचनांची दखल घेतली जात नाही. स्टोरीमिररने मात्र, वाचक आणि लेखकांना एका कृतीशील मार्गाने जोडण्याची सुरुवात केली. आता, ई-मासिकाच्या माध्यमातून वाचक आणि लेखकांतील संबंध वाढवण्याची वेळ आली आहे.
सदर ई-मासिकाला स्टोरीमिरर डायजेस्ट म्हणून संबोधण्यात येणार असून या साहित्यविषयक मासिकात संपादकीय चमुने निवडलेल्या सर्वोत्तम रचनांना स्थान मिळेल. दरम्यान, आम्ही या मासिकात जुन्या उत्कृष्ट साहित्यकृती, आगामी स्पर्धा, वाचकांच्या प्रतिक्रिया, चर्चेसाठी मंच आणि लेखकांच्या मुलाखती आदी देत आहोत.
विनामूल्य ई-मासिक मिळविण्यासाठी हे करा -
स्टोरीमिररच्या संकेतस्थळावर लॉग इन करा.
स्टोरीमिरर शॉपच्या दुव्यावर जा (https://shop.storymirror.com).
ई-मासिके शोधा आणि डाऊनलोड करा.
एकदा डाऊनलोड केले की स्टोरीमिरर अँड्रॉइड आणि आयओएस अॅपच्या मदतीने ते वाचा.
एकदा आपल्या डिव्हाइसमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर आपण ते ऑफलाइनदेखील वाचू शकता.
ई-मासिकामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी आपला अभिप्राय आम्हाला कळवा.
जर आपल्याला मासिकासाठी साहित्य निवड करणार्या चमुमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमचे नाव द्या.
चला तर मग, आपण एकत्र येऊन साहित्याच्या पाठिंब्याने उत्तम राष्ट्र घडवू.
टीम स्टोरीमिरर