Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

सत्तरच्या दशकातली अमेरिका : एका भारतीय विद्यार्थ्याचा प्रवास (Sattarchya Dashakatali America : Eka Bharatiya Vidyarthyacha Pravas)

★★★★★
Author | अनिल राजवंशी (Anil Rajvanshi) Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | 9788119445226 Pages | 148
PAPERBACK
₹250
E-BOOK
₹125


About the Book:


१९७४ साली वयाच्या चोविसाव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या आयआयटी कानपूरच्या ध्येयवादी विद्यार्थ्याची ही कथा आहे. अमेरिकेतील अत्यंत लाभदायक जीवनक्षेत्र सोडून १९८१ मध्ये तो ग्रामीण भारतात काम करण्यासाठी परतला. सगळे सल्ले धुडकावून परत आलेल्या आणि त्या प्रक्रियेत स्वत:ची ओळख पटलेल्या आदर्शवादी तरुणाची ही गोष्ट आहे.


१९७० च्या दशकातल्या त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्य आणि अनुभवांच्या आठवणींबद्दल डॉ. अनिल राजवंशी यांनी आकर्षक आणि रंगतदार शैलीत लिहिलं आहे. ही एक प्रेरणादायी कहाणी आहे आणि सर्व भारतीयांना विशेषतः अनिवासी भारतीय आणि परदेशी जायला इच्छुक पण खास करून ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्याची आस असलेल्यांना भावेल.


हे पुस्तक प्रथम २००८ साली इंग्रजीत छापलं गेलं आणि त्याचा मराठी अनुवाद आता येत आहे. पुस्तकाची अग्रिम प्रत महाजालावर उपलब्ध करण्यात आली होती आणि जगभर त्याला अफाट सकारात्मक प्रतिसाद मिळाला.


About the Author:


अनिल राजवंशी पेशाने यांत्रिकी अभियंता आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील बी. टेक्. पदवी त्यांना आयआयटी कानपूरमधून तर पी.एच्.डी. अमेरिकेतील गेन्सव्हिलस्थित युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॅारिडामधून मिळाली. ते आणि त्यांची पत्नी नंदिनी निंबकर (त्याही अमेरिकेत शिकलेल्या शास्त्रज्ञ आहेत) निंबकर ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) नावाची ग्रामीण भारतातल्या फलटण या तालुक्याच्या गावी असलेली एका लहानशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित गैर-सरकारी संस्था चालवतात.


ते नवीकरणीय ऊर्जा, ग्रामीण आणि शाश्वत विकास व अध्यात्म या क्षेत्रांत संशोधन करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांनी या विषयावर व्यापक स्वरुपात लिहिले आहे. त्यांच्या नावावर २५० लेख, ७ पेटंट आणि ५ पुस्तके आहेत. त्यांच्या कामासाठी २०२२ सालच्या पद्मश्रीसह त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी अध्यात्म, तंत्रज्ञान आणि शाश्वतता या विषयावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत.Be the first to add review and rating.


 Added to cart