We will fetch book names as per the search key...
About the Book:
या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे.
कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे,याचा लेखकाने शोध घेतला आहे,याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.
About the Author:
राहुलच्या कथा गेल्या काही वर्षात अनेक दर्जेदार मासिकांत आणि दिवाळी अंकांत प्रकाशित झाल्या आहेत. याआधी त्याचा 'अज्ञात' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. तो मराठी विषयाचा शिक्षक असून त्याने 'MAQN' या LGBTQ संस्थेत, तसेच ‘लाईफ स्कूल, पुणे’ या संस्थेत काही काळ स्वयंसेवक म्हणून काम केले आहे.
चौकटीबाहेरचे विषय लिहिताना पात्राच्या वेदनेशी, जगण्याशी, अश्रूंशी प्रामाणिक राहून लेखन करण्याचं कसब त्याच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकाला त्याच्या कथा स्पर्शून जातात आणि कथांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.
कोंडून ठेवलेल्या अश्रूंना मुक्त होण्यासाठी या कथांचा प्रकाश शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही पोचणं गरजेचं आहे. त्यासाठी राहुलला मानवतेची साथ हवी आहे.