Quotes

Audio

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

गुंफण नात्यांची (Gumphan Natyanchi) | Free Preview

★★★★★
Read the E-book in StoryMirror App. Click here to download : Android / iOS
Author | सौ. अनुजा केतन शेठ ( Mrs. Anuja Ketan Sheth) Publisher | StoryMirror Infotech Pvt. Ltd. ISBN | ebook Pages | 25
E-BOOK
₹0

About the Book:


आयुष्य जगताना जोडली जातात अनेक नाती-गोती...

काळाच्या प्रवाहात वाहत जातात त्यातली कित्येक नाती...

पैशामागे धावताना माणूस विसरतो रक्ताची नाती...

नव ते हवं या प्रमाणे नवीन नाती जपताना जुनी नाती मात्र हळूच निसटून जाती...

कोण आपले, कोण परके ना कोणास कळती...

टिकून राहती तीच नाती जे करीती खोटी स्तुती...

भल्या गर्दीत पडे एकटा ज्यास न जमली ही कॄती...

जुन्या आठवांच्या स्मॄतीमध्येच काहीजण रमून जाती...

तर काही मात्र नव्या नात्याच्या मागे मागे धावती...

कोणी नाही कोणाचे हे जरी असले खरे...

तरी मन हे वेडे मात्र उगाच अपेक्षा करते का बरे?

भंग होता त्या अपेक्षांचा, नकळत ओल्या होतात कडा...

तुटलेल्या या नात्यातून माणूस मात्र नक्कीच शिकतो एक धडा...

असली जरी रक्ताची नाती तरी लोकं मात्र पैसा असे त्यालाच पुसती...

पैसा आणि स्टेटस जपणारी दिखाऊ नाती...

ह्या साऱ्या मधून हरवून जाती खरी अनमोल नाती...


आपले आयुष्य म्हणजे अनेक नात्यांच्या कडू-गोड आठवणींचे मिश्र लोणचं असते...या लोणच्यात आवश्यक असतो तो शब्दांचा खार...तो नेहमी जपून वापरावा लागतो, कारण जास्त प्रमाणात झाला तर आयुष्यातील नात्यांचं लोणचं खराब होतं...कमी प्रमाणात झाला तर ते लोणचे चांगले मुरत नाही... म्हणून चांगल्या वाईट कोणत्याही प्रसंगी शब्द हे नेहमी जपून वापरावे लागतात. कुठे, कसं आणि किती शब्द वापरायचे याचे प्रमाण एकदा समजले की, आपल्या आयुष्यातील अनेक नात्यांचे मिश्र लोणचे रुचकर होत जाते अन चांगले मुरते.


About the Author:


लेखिकेला लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतले आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी विप्रो मधील नोकरी सोडल्यानंतर आता त्या फोनिक्स क्लासेस घेतात. अनेक ऑनलाईन पोर्टल वर त्या लेखन करतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना विजेतेपद मिळाले आहे.


लेखिकेला अभिनय आणि नृत्य याची देखील आवड आहे. ऑथर ऑफ इयर 2021 हा किताब स्टोरीमिररकडून मिळाला आहे. तसेच मराठी साहित्यामध्ये केलेल्या कामगिरीसाठी विद्या उत्तेजक पुणे यांजकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड त्या नेहमीच करत असतात. कथांमधून समाज प्रबोधन घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. .If you really liked the preview, visit the links given below & buy your copy now. The book is available on Amazon, Flipkart & Google Books.


Available links


  1. SM Shop: https://shop.storymirror.com/gumphan-natyanchi/p/16se70c5cl9saod5k
  2. SM Shop (ebook): https://shop.storymirror.com/gumphan-natyanchi-ebook/p/16se70ne4la0zjhkn
  3. Amazon India:https://amzn.to/3DLGAYq
  4. Kindle: https://amzn.to/3DIw0BN
  5. Flipkart: https://www.flipkart.com/gumphan-natyanchi/p/itmad7b8a9ac1c04?pid=RBKGJMT55FAWHHV6
  6. Snapdeal: https://www.snapdeal.com/product/-gumphan-natyanchi/657215662258
  7. Google books: https://play.google.com/store/books/details?id=97qZEAAAQBAJ
Be the first to add review and rating.


 Added to cart