We will fetch book names as per the search key...
About the Book:
'आलेला क्षण जगणे , गेलेला क्षण तिथेच सोडून देणे ' , ही जीवन जगण्याची किल्ली असली तरी ,अनुभवातून चांगल ते घेण्यात हरकत नाही. प्रत्येक क्षण काही तरी सांगत असतो , प्रत्येक अनुभव नवं काही शिकवत असतो . गरज हवी ती दृष्टिकोनाची . वाईट घटना नेहमी दुःख द्यायलाच असतात आणि चांगल्या घटना सुख द्यायलाच असतात असं नाही .घटना ह्या आपल्याला शिकवण देण्यासाठी घडतात .ते अनुभवावं , त्यातून चमक ती घ्यावी आणि आयुष्यच सोन करावं.
उगवत्या सूर्य प्रेरणेचा स्तोत्र मानला जातो , मग मावळता सूर्य का नाही , त्यात देखील प्रसन्नता आहे , सुंदरता आहे , शांतता आहे , विविध रंगांच्या छटा आहे , आणि प्रेरणा सुद्धा . जरी सूर्य निरोप घेत असला तरी तो दिवसभराच्या अनुभवाची भेट देत असतो . आणि उद्या पुन्हा जोमाने जीवन जगण्याची उमेद देत असतो . सगळ तेच आहे , नव काहीच नाही , केवळ प्रयत्न आहे , जे दृष्टीआळ केलंय त्याला दृष्टीपुढे दर्शवण्याची .
तेजोमय प्रकाशाने जगण्याची स्फूर्ती देतो तो सूर्य
विशाल आकृतीने अफाट आयुष्याची प्रचिती देतो तो सूर्य
तटस्थ राहून एकनिष्ठ असण्याची शिकवण देतो तो सूर्य
रंगांचा सडा शिंपीत , निरोप सुंदर असण्याची उमेद देतो तो सूर्य
आणि ...........
पुढील पहाटेसाठी अनमोल अनुभवांची शिदोरी बांधून देतो तो सूर्यास्त .
About the Author:
डॉ संपदा घाटबांधे, वय वर्ष 23, जन्म महाराष्ट्रातील केशोरी या छोट्याशा गावी झाला.गाव जरी छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठे आहे. जग बघणं आणि पुस्तक वाचणं या दोन्ही गोष्टीत जरा साम्य आणि या दोन्ही गोष्टीमध्ये अत्याधिक रुची ठेवणारी संपदा! आजवर अनेक पुस्तके वाचली आणि त्यामधुनच लेखनाची आवड निर्माण झाली. मुळात अव्यक्त स्वभावाची असल्यामुळे मनातील भावना शब्दांत रेखाटण्याची सवय झाली आणि हळुहळु लेखनाच्या समुद्रात वाहत गेली. तसा लेखनाचा फारसा अनुभव नाही, मात्र 'प्रयत्नार्थी परमेश्वर' मानत पुस्तक लिहण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तसे अनेक साहित्य संग्रहात लेख प्रकाशित आहेत.
कारकिर्द बाबतीत सांगायचे झाल्यास,बी..ए.एम.एस चं शेवटचं वर्ष अभ्यासत आहे. स्वप्न हे डॉक्टर बनण्याचं परंतु लेखन आणि वाचन हे छंद! लेखनातून जरी आनंद मिळत असला तरी इतरांना त्यातून प्रेरणा मिळाल्यास जास्त समाधान मानून घेणारी लेखिका 'जे शब्द समोरा-समोर व्यक्त होत नाही ते लेखनात व्यक्त होतात' हा मूलमंत्रजोपासून कार्यरत राहण्याचा हा प्रयत्न..