We will fetch book names as per the search key...
About the Book:
एकीकडे वडीलधार्यांचा मान ठेवणारी, आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात सफल असणारी परंतु वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची काही कुटुंबे आणि त्यांची लहान मुले. ही कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडते एक आगळीवेगगळी जाहिरात आणि या जाहिरातीतून त्यांना भेटतात एक आजोबा श्री. अण्णासाहेब पटवर्धन!
दुसरीकडे आहेत अण्णासाहेब आणि त्यांच्यासारखेच अनुभवी, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या भक्कम, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून जीवनाची पहिली खेळी सफल केलेले पूर्ण समाधानी असे त्यांचे मित्र. वडीलधार्यांबद्दल मनात मान असला तरी त्यांची मुले आपापल्या जीवनात व्यग्र झालेली. एकटेपणाला कंटाळून या मित्रांच्या मनात आपल्या जीवनाच्या दुसर्या टप्प्यातदेखील काहीतरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातून अस्तित्वात येते एक पूर्णपणे नवीकोरी कल्पना!
कथानायक अण्णासाहेब मग आपल्या मित्रांच्या मदतीने या कुटुंबांच्या समस्या कशा सोडवतात हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा 'आजोबा भाड्याने देणे आहे'.
About the Author:
ममता सुनील अग्रवाल यांचा जन्म १९६८ साली महाराष्ट्रात वर्धा येथे झाला. १९९७ मध्ये संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी परीक्षेत ममता विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापनक्षेत्रात बर्याच आंतरराष्ट्रीय पदविका मिळवल्या. १९९१ साली मराठवाडा विद्यापीठात संगणकशास्त्र व्याख्याता म्हणून सुरुवात करुन नंतर त्यांनी प्रोग्रॅमर म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. १९९६ पासून ममता संगणकशास्त्र क्षेत्रातच अग्रगण्य असलेल्या 'टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस' मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करीत आहेत. त्यांचे पती डॉक्टर असून त्यांना जुळ्या मुली आहेत.
त्यांचा 'मन से आत्मा तक' हा हिंदी कवितासंग्रह २०१३ मध्ये गाझियाबादच्या मांडवी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. त्या हिंदी-उर्दू भाषेत कविता, कथालेखन आणि ब्लॉगगलेखनही करतात.
ममता यांना लहानपणापासूनच मराठी वातावरण मिळाले आणि मराठी भाषेवरचे त्यांचे प्रेम वाढत गेले. 'आजोबा भाड्याने देणे आहे' ही ममता अग्रवाल यांची मराठीत प्रकाशित होणारी पहिलीच कादंबरी आहे.