Quotes New

Audio

Forum

Read

Books


Write

Sign In

We will fetch book names as per the search key...

शिवछत्रपती (Shivchatrapati) | Pre Order

★★★★★

AUTHOR :
चंदन पवार (Chandan Pawar)
PUBLISHER :
StoryMirror Infotech Pvt. Ltd.
ISBN :
9789391116996
PAGES :
316
PAPERBACK
₹375


About the Book:


खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कितीही लिहले तर ते थोडकेच! शिवकार्याची लांबी-रुंदी कोणीही मोजू शकत नाही.


शिवचरित्र म्हणजे अमृतच...! ते कोणत्याही भांड्यातून प्या त्या अमृताची गोडी बदलत नाही. आज व्हाटस्अपच्या काळात नको तितके समूह आणि नको ते संदेश वाचता पाहता वीट येऊन जातो. अशावेळी बहुतेक लोक संसाधनांना नावे ठेवतात.पण वापरकर्ते काही सुधारत नाहीत. या संसाधनाचा योग्य वापर करून शिवआचार-विचारांचा प्रचार व प्रसार केल्यास प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील असे मला वाटते.


सध्याचा काळ हा घडण्यापेक्षा बिघडण्याचा जास्त वाटतोय. ज्यांनी समाज घडवायचा तेच हातातील साधनाने आग लावत सुटले आहेत.अशा काळात सर्वाना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे शिवचरित्र...! आबालवृद्धांना आवडेल अशा सहज-सोप्या शैलीतले हे शिवचरित्र वाचनीय पेक्षा अनुकरणीय आहे. बदलत्या काळात शिवचरित्र डोक्यात घेण्याची गरज आहे. आचरणकर्ते शिवभक्त वाचनातून निर्माण होतील असा मनोदय व्यक्त करतो.


शिवइतिहासाची सद्यस्थितीशी सांगड घालून आज आपले राष्ट्र बलवान करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रम व कृतींची आवश्यकता आहे हे हक्काने व हट्टाने प्रस्तुत कादंबरीतून प्रतिपादन केले आहे. कारण आवाहन व आव्हान केल्याशिवाय आम्ही जागे होत नाहीत ही आमची शोकांतिका आहे.


शिव आचार-विचारांचा जागरकार्याच्या या चळवळीत मला खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्यच म्हणावे लागेल....


राष्ट्र प्रथम. वंदे मातरम्.

जय शिवराय


About the Author:


चंदन पवार... मुळगाव धुळे जिल्ह्यातील कमखेडा.. व्यवसायाने शिक्षक असलेल्या चंदन पवारांच्या वाचन-लेखनाचे छत्रपती शिवराय हे जणू प्रेरणास्त्रोतच..! शालेय जीवनापासून इतिहास विषयांत त्यांना विलक्षण रुची आहे.. त्यातून छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी व ओजस्वी इतिहासावर आधारित अनेक कादंबऱ्यांचे वाचन झाले आणि त्यातून छत्रपती शिवरायांवर आपणही काहीतरी लिहावे अशी प्रबळ इच्छा मनात निर्माण झाली.. तद्नंतर वेगवेगळ्या साप्ताहिक, दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रात त्यांचे शिवचरित्रावरील लेख- कविता प्रकाशित झाले आहेत.. “शिवबा” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर आता साकारत असलेली “शिवछत्रपती” ही ऐतिहासिक कादंबरी त्याचेच फलित आहे...


ADD TO CART
 Added to cart